पंडित विश्वनाथव्यास बाळापूरकर विरचीत ज्ञानप्रबोध ओवी क्र.११ ते २० अर्थासह.

                                          दिनांक:२७:०३:२०२०
                                             शुक्रवार

पंडित विश्वनाथव्यास बाळापूरकर विरचीत
ज्ञानप्रबोध


हेंं सकळही ज्ञान : जालें जया गुरुचेन
तया साष्टांगींं अभिवंदन : करीतु असें ॥११॥

हे सर्व ज्ञान ज्या गुरुमाउलीमुळे झाले. त्यांना साष्टांग
नमस्कार करीत आहे.।।११।।

चुकउनि अविद्येचा वर्गु : हा दाविला मोक्षमार्गु
जेणें यकें जन्में सर्गु : चुके ऐसा॥१२॥

कारण गुरुमाऊलीने देवतामार्ग चुकवून हा ईश्वराचा मोक्षमार्ग दाखवला. ज्या
ईश्वराच्या मोक्षमार्गाला एक जन्म दिला असता संसार चुकतो. ।।१२।।

परिसा पहिले मुनीकमळाकरें:जियें सांघीतली अक्षरें
तियें वाढीनलीं विस्तारें : सबीजें भणौनि॥१३॥

ऐका ! पहिले गुरु कमळाकर मुनीने जी ब्रह्मविद्येची अक्षरें सांगितली. ती ब्रह्म
विद्येची अक्षरें सबीज होती म्हणून ज्ञानप्रबोध ग्रंथाच्याद्वारे विस्ताराने वाढली.||१३||


तया फळ लाधले बोधवृक्षा:जे परधर्मी घडली भीक्षा
वरी अचळींं लाधली दीक्षा : ते अढळ जाली॥१४॥

त्या ब्रह्मविद्येच्या सबीज अक्षरातून बोधरुपी वृक्ष निघाला व त्या बोधरुपी
वृक्षाला ईश्वरधर्मात भीक्षारुपी फळ लागले. वरुन  ती भीक्षा अचल शिवराजबासा पासून झाली म्हणून ती भीक्षा अटळ झाली.|१४|

जैसी वीउनि अविद्यमान माये : ते तितुलेनि उतराइ होये
वील्हळी वाढवी दाये : तोंडिचेनि घांसें ।।१५।।

 एखादी माता मुलाला जन्म देऊन लागलीच मरते.व
मुलाला जन्म देऊन उतराई होते. मग त्या बाळाला दाई तोंडच्या घासातील घास देऊन वाढवते.।।१५।।


तैसें मुनी कमळाकरु : लाउनि गेला बोधांकुरु
तो पाळिला सिवराजें उपचारु : करुनियां॥१६॥

तसे गुरु कमळाकरमुनी माझ्याठिकाणी बोधरुपी अंकुर लावून गेले
कैवल्यवासी झाले. मग नंतरचे गुरु अचळ शिवराजबास माझ्या ठिकाणी असलेल्या बोधरुपी
अंकुराला प्रयत्नकरुन सांभाळतात.॥१६॥



यालागि प्रथम उपकारकां : अनुसरलेयां मार्गिकां
सुबोधां नामधारका : सकळां प्रणिपातु ।।१७।।

बोधरुपी अंकुर लावला म्हणून प्रथम उपकारकाला मग मार्गस्थ अनुसरले
मग बोधवंताना मग नामधारकांना व यांच्यासोबत सर्वांना नमस्कार करतो. ।।१७।।

असोहे समस्तांचियाप्रसन्नता:करीन ज्ञानप्रबोध कथा
जया निवर्ते संसारवेथा : जन्ममरणाची ।।।१८।

आतां सर्वांच्या प्रसन्नता अश्याच राहू द्या. या सर्वांंच्या प्रसन्नतेने ज्ञानप्रबोध कथा करतो. ज्या
ज्ञानप्रबोध कथेने जन्म-मरणाची मोठी प्रापंचिकव्यथा निघून जाते.॥१८॥

हे कथा कैसी सांगें : हों काज ब्रह्मविद्येचे खांगें
जें अनुष्टितां आंगें : मोक्ष सीधे ।।१९।।

परंतु ज्ञानप्रबोध कथा कशी सांगू ? विचार केला तर ज्ञानप्रबोध कथा ब्रह्मविद्येचें
एकांत घर आहे. जी ब्रह्मविद्या शरीरानी आचरली असता मोक्ष होतों. म्हणून ज्ञान
प्रबोध कथा कशी सांगू ?।।१९।।


कृपा रहस्य

किती बोलों हे वित्पती : इये परमार्ग सद्गती
कृपामूळ संक्षेपोक्ती : म्हणे विस्वनाथु ॥२०॥

कृपेचा विस्तार किती बोलू ? कारण
परमार्गात ईश्वरप्राप्तीला कृपा ही मूळ आहे. मग ते कृपामुळ थोडक्यात सांगतो. असे
विस्वनाथव्यास म्हणतात. ॥२०॥

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

विश्वनाथव्यास बाळापुरकर विरचीत ज्ञानप्रबोध ओवी क्रमांक १ ते १० अर्था सह।

पंडित विश्वनाथव्यास बाळापूरकर विरचीत ज्ञानप्रबोध ओवी क्र २९ ते ४८

पंडित विश्वनाथव्यास बाळापूरकर विरचीत ज्ञानप्रबोध ओवी क्र ४९ ते ६७