खुप संशोधन करून ही माहिती मी जमवली आहे. पूर्ण लीळाचरित्रा मधे स्वामींना मार्गी आसन(रस्त्याने चालत असतांना रस्त्याच्या बाजूला बसने) झाले ते ऐकून तेवीस वेळा ते पुढील प्रमाणे. तयांत....तेवीस = पूर्वार्धामध्ये एकूण तेवीस ठिकाणी आसन झाले. ते पुढील प्रमाणे आहेत. १)काटीया सोंकरणे (पू. ७९) २)पव्है रामदेवां भेटि (पू. ८८) ३)लोणारमार्गी चोरु कुमति हरणे (पू. १००) ४)जुंझमाळी आसन (पू. १००) ५)वीसैए रामदेवीं कमळी पूजा (पू. १४५) ६)मार्गी वीज्ञानदर्शन : पहवे आसन (पू. २६१) ७)मार्गी आरोगण (पू. २६६) ८)तपोवनीं माणिकेश्वरी आसन (पू. २८८) ९)रामनाथां मागां आसन (पू. २९१) १०)मार्गी कामधेनु नामपूर्वक भिक्षान आरोगण (पू. ३८८) ११)तपोवनीं साइंदेवां भेटि (पू. ४२४) १२)मार्गी माणीकदंडी आसन (पू. ४९१) १३)बोरीए राणाइसां : लाखाइसांभेटि (पू. ५०५) १४)श्रीपुरी ताएस्वरी आसन (पू. ५२६) १५)पींपळगावीं सोमनाथीं आसन (पू. ५३०) १६)नींबातळि वीस्णुभटां भेटि (पू. ५३३) १७)डोणी उतरौनी पंचाळेस्वरी अवस्थान (पू. ५४४) १८) पिंपळदरडिये आसन (स्थानपोथी) १९)मॉडवखडकी आसन (पू. ५४२) २०)भोजनतां सुक्रदरिसनी जोतीक प्रसंसा (पू. ५५२) २१) म...
Posts
पंडित विश्वनाथव्यास बाळापूरकर विरचीत ज्ञानप्रबोध ओवी क्र ६८ ते ९९.
- Get link
- X
- Other Apps
दिनांक :०४:०४:२०२० शनिवार पंडित विश्वनाथव्यास बाळापूरकर विरचीत ज्ञानप्रबोध निरबाह्यापुरता योगक्षामु : करी निरहींसकु उद्यमु अगत्या ग्रहस्थाश्रमु : चाळी ऐसा ।।६८।। अर्थ : निश्चिंंत होऊन कल्याणापुरताच हिंसारहीत व्यवसाय करतो व पुढे होऊन गृहस्तधर्म चालवतो ।।६८।। मीन जाळा सापडला : वागुरे मृग पडिला तैसा ग्रह-बंदिसाळे घातला : अडणी असे ॥६९।। अर्थ : मासा जाळ्यात सापडला. हरिण जाळ्यात पडला. ग्रह कारावासांत घातला तसा गुरुची अडणी तथा मार्गाची अशी म्हणून घरी राहिला आहे.।।६९।। म्हणे मी येथौनि कै सुटैन : मग योगसुख पावैन ग्रहमिखें बंदिखान : मांडिले हे ।।७०।। आणि म्हणतो, मी गृहस...
पंडित विश्वनाथव्यास बाळापूरकर विरचीत ज्ञानप्रबोध ओवी क्र ४९ ते ६७
- Get link
- X
- Other Apps
दिनांक:२९:०३:२०२० रवीवार पंडित विश्वनाथव्यास बाळापूरकर विरचीत ज्ञानप्रबोध जैसें धर्मश्रवणेंवीण : नव्हे दोषनिरसन ना तरि न फिटे मूर्खपण : शास्त्रहीनाचें॥४९।। जसे धर्म ऐकल्याशिवाय दोषाच निरसन होत नाही. नाही तरी धर्मऐकल्याशिवाय ब्रह्मविद्याशास्त्र हीनाचा मूर्खपणा जात नाही. ॥४९।। तैसें न करितां गुणकथन : वाचेसि नाहीं पवित्रपण न स्मरतां श्रीचरण : जीउ सुध नव्हे॥५०॥ तसे ईश्वराचे गुण सा...
पंडित विश्वनाथव्यास बाळापूरकर विरचीत ज्ञानप्रबोध ओवी क्र २९ ते ४८
- Get link
- X
- Other Apps
।।श्री परेशाय नमः।। दिनांक:२८:०३:२०२० शनिवार पंडित विश्वनाथव्यास बाळापूरकर विरचीत ज्ञानप्रबोध तिएचा महिमा बोलतां : सकळ शास्त्रांं अपुर्णता ते मज मतिहीना प्राकृता : वर्णवे केवि।।२९।। अर्थ: कृपेचा महिमा बोलतानां सर्वशास्त्रांना अपूर्णता येते. मग मला मतिहीन खेडमटाला कृपेचा महिमा कसा वर्णन करता येईल ?।।२९।। सकळ सीधांता अगोचर : परवस्तु निराकार जेथचे कृपा-गहंवर : कवणा कळे ।।३०।। अर्थ: सर्व सिध्दातांना ...
पंडित विश्वनाथव्यास बाळापूरकर विरचीत ज्ञानप्रबोध ओवी क्र २१ ते २८
- Get link
- X
- Other Apps
पंडित विश्वनाथव्यास बाळापूरकर विरचीत ज्ञानप्रबोध ओवी क्र.११ ते २० अर्थासह.
- Get link
- X
- Other Apps
दिनांक:२७:०३:२०२० शुक्रवार पंडित विश्वनाथव्यास बाळापूरकर विरचीत ज्ञानप्रबोध हेंं सकळही ज्ञान : जालें जया गुरुचेन तया साष्टांगींं अभिवंदन : करीतु असें ॥११॥ हे सर्व ज्ञान ज्या गुरुमाउलीमुळे झाले. त्यांना साष्टांग नमस्कार करीत आहे. ।।११।। चुकउनि अविद्येचा वर्गु : हा दाविला मोक्षमार्गु जेणें यकें जन्में सर्गु : चुके ऐसा ॥१२॥ कारण गुरुमाऊलीने देवतामार्ग चुकवून हा ईश्वराचा मोक्षमार्ग दाखवला. ज्या ईश्वराच्या मोक्षमार्गाला एक जन्म दिला असता संसार चुकतो. ।।१२।। परिसा पहिले मुनीकमळाकरें:जियें सांघीतली अक्षरें तियें वाढीनलीं विस्तारें : सबीजें भणौनि ॥१३॥ ऐका ! पहिले गुरु कमळाकर मुनीने जी ब्रह्मविद्येची अक्षरें सांगितली. ती ब्रह्म विद्येची अक्ष...
विश्वनाथव्यास बाळापुरकर विरचीत ज्ञानप्रबोध ओवी क्रमांक १ ते १० अर्था सह।
- Get link
- X
- Other Apps
दिनांक: २६:०३:२०२० गुरुवार पंडीत विश्वनाथव्यास बाळापूरकर महानुभाव विरचीत । ज्ञानप्रबोध। श्री परेशाय नमः ईश्वराची स्तुती जो वाचात्रया अतीतु : षडु प्रमाणा अव्यक्तु तो वंदं सर्वात्मा उपकारभूतु : जीवोधरणु ।।१।। जो पश्यंती,मध्यमा,वैखरी या तीन वाचेच्या वेगळा आहे. जो सहा शास्त्र किंवा अनुमान,उपमान शाब्द,प्रत्यक्ष,अर्थापत्ती,अनुपलब्धी या सहा प्रमाणांना दिसत नाही. तो सर्वांचा आ त्मा,उपकारभूत जीवाचा उध्दार करणारा,त्याला नमस्कार करूं. ॥१॥ तो जन्मादिबीजभूतां : इस्वरु निज पिता भवमोचक...