पंडित विश्वनाथव्यास बाळापूरकर विरचीत ज्ञानप्रबोध ओवी क्र ६८ ते ९९.
दिनांक :०४:०४:२०२०
शनिवार
पंडित विश्वनाथव्यास बाळापूरकर विरचीत ज्ञानप्रबोध
निरबाह्यापुरता योगक्षामु : करी निरहींसकु उद्यमु
अगत्या ग्रहस्थाश्रमु : चाळी ऐसा ।।६८।।
अर्थ : निश्चिंंत होऊन कल्याणापुरताच हिंसारहीत व्यवसाय करतो व पुढे होऊन गृहस्तधर्म चालवतो ।।६८।।
मीन जाळा सापडला : वागुरे मृग पडिला
तैसा ग्रह-बंदिसाळे घातला : अडणी असे ॥६९।।
अर्थ : मासा जाळ्यात सापडला. हरिण जाळ्यात पडला. ग्रह कारावासांत घातला तसा गुरुची अडणी तथा मार्गाची अशी म्हणून घरी राहिला आहे.।।६९।।
म्हणे मी येथौनि कै सुटैन : मग योगसुख पावैन
ग्रहमिखें बंदिखान : मांडिले हे ।।७०।।
आणि म्हणतो, मी गृहस्तधर्मा तुन कधी सुटेन. कारण मगच मला ज्ञान,भक्ती,वैराग्याचे सुख मिळेल. घर निमित्तकरुनि घर बंदिखाना तयार केला आहे.||७०।।
ऐसा अहर्निशीं भावी उद्वेगु : तेजी सकळही उपभोगु
मग अडणि सारुनि त्यागु : सर्वाचा करी||७१||
अश्या प्रकारे रात्रंदिवस मना मध्ये चिंता करतो
व घरात राहून सर्व उपभोगाचा त्याग करतो. मग गुरुची तथा मार्गाची अडणी पूर्णकरुन,मग सर्वाचा त्याग करुन अनुसरतो हा बोधवंताचा
बाह्यत्याग सांगितला।।७१।।
अंतर विरलेपण
तो केलेयांवरी त्यागु : बर्बाणे देहीं सन्यासयोगु
तेणें सानकुळ जगु : महंतत्वें मानी
॥७२॥
बाह्यत्याग केल्यावर ग्रहस्थधर्म जाऊन त्याच्या अंगात संन्यासधर्म येतो. त्यामुळे जन श्रेष्ट मानतात.||७२।।
ऐसा सन्मान्यतेचे सुख पडे : तो विखोचि सेविला घडे
यालागि चिन्हादिकी लपउनि दडे : दीनत्वामाजि॥७३॥
अशाप्रकारे अनुकुळ जनाकडून मान मान्यतेचे सुख मिळते. परंतु मान मान्यतेचे सख विखोच सेवन केल्यासारखे वाटते. याकरीता भक्ती वैराग्य लपवुन दरिद्र्यामध्ये दडतो. ७३।।
मग विषयेमूळ मान्यता : तेथही विरमतां
भरुनि भावी चित्ता : अर्मानित्व||७४||
मग विषयाला मूळ असलेली मान्यता,त्याठिकाणी पण विरमता घेऊन,मनांत मान्यता नको असे भावतो.||७४।।
तो मानाचेनि भारें दडपे : पुजेतें बीहनि कांपे
पुरस्करिलेयां वांसिपे : वर्मे जीवीं||७५||
मान्यतेच्या ओझ्याने दडपला जातो. पूजेला भिऊन
कापतो. सत्कार केला तर मनात दर्चकतो व दबला जातो.||७५।।
स्वकीर्तीचेनि नावें : वोसावे श्रवणासवें
कोमाउनि जाये गौरवें : जीवें आंगें।।७६॥
आपली कीर्ती ऐकतांच संकोचतो. गौरव केला अस
ता,मर्नाने व शरीराने सुकून जातो.।।७६।।
जनअव्हेराची करी आस : पाहे अवज्ञेयेउती वास
धिक्करणेयांची बहुवस : चाड जीवीं॥७७॥
जन अव्हेरावे अशी ईच्छा करतो. कोणी अवज्ञा
करेल ईकडे पाहतो. धिक्कार करावा याची मनांत पुष्कळ ईच्छा ठेवतो. ७७।।
भणंग बुधी वोर्भावीलें : तेव्हळि होये ऐसें जियालें
म्हणे आजि येणे संपादिले : परम-सुख॥७८।।
जर कोणी भिकारी बुध्दीने बोलवले तर त्यावेळी
त्याला जगलो असे वाटते व म्हणतो, आज याने मला भिकारी म्हणून श्रेष्टसख दि||७८।।
भणौनि रंकवृत्तीचिये खोपे : जै महिमेभेण लपे
तै अर्मानित्व आरोपे : तया आंगीं॥७९॥
म्हणून ज्यावेळी महिमेच्या भितीने भिकारी वर्तनाच्या
खोळीत लपतो. त्याचवेळी त्याच्या अंगात मान सन्मान नको असे येते. ॥७९॥
आतां मान्यता-बीजाचा कोंभु : तै निपटौनि मोडे डंभु
उपाधी त्यागारंभु : मांडीत सांतां||८०॥
आतां मान्यतारुपी बीजाचा कोंभरुपी दंभ त्याचवेळी संपूर्ण मोडला जातो.
ज्यावेळी ज्ञान,भक्ती वैराग्य उपाधीच्या त्यागाला सुरुवात होते.।।८०।।
अवाच्यतेचां कुपी : अभयासिली सामग्री लोपी
आथिले गुण निक्षेपी : अकर्तेपणामाजि||८१||
आपण अभ्यास केलेली सामुग्री मौन्यरुपी बाटलीत बंद करतो आपण प्राप्त केलेले ज्ञान भक्ती
वैराग्य मी प्राप्त केले नाही यामध्ये निक्षेप करतो.
जडत्वाची आंगभूषणे : वेडीवंतेचि मिरवणे
उन्मतवत बोलणे : विचरे पिसाचवत||८२॥
अंंगावर अज्ञानरुपी दागिने घेऊन वेड्यासारखा राहतो
व मद्यपान केलेल्या मनुष्यासारखा बोलतो व भूतासारखा राहतो. ||८२।।
यहवीं तयाचेनि पाडें : सीहाणा सकुसळु न जोडे
चातुर्ये असौनि फुडें : क्रीडे बाळकवत||८३||
विरक्तता सोडून त्याच्यासारखा शहाणा,सकुशल
कोणी भेटणार नाही. तो चतुर असुन स्पष्टपणे अज्ञानासारखा खेळतो. ॥८३।।
बोधवंताचे बाह्य विकार त्याग
अंदभित्वाचीया लब्धी : तेजूनि सकळही उपाधी
ऐसेनि वर्ते निर्वधी : सोच्यपणे
||८४॥
(घरी असलेल्या ज्ञानीया) दंर्भरहीताच्या लोभामुळे ज्ञानात्रिक उपाधीचा त्याग
करुन मर्यादारहीत असमर्थपणे राहतो.
||८४||
भरला धुळिसारकेतें : निलेख उपखी देहातें
या स्थिती रुपा वईसेतें : हारौनि घाली
||८५॥
धुळीच्या सार चिन्हाने भरलेला आहे. दर्लक्ष करुन आपल्या देहाची उपेक्षा करतो. देहाच्या उपेक्षेत आपल्या सौदर्याला व ताऊँण्याला हरवून टाकतो.||८५।।
अहिंसा धर्म आचार
ऐसेया परी धर्मपरायणे : सर्वत्र विचरावें तेणें
मुक्षत्वें अहींसेचे देखणे : पुढे करुनि॥८६॥
अशाप्रकारे धर्मतत्पर पुरुषाने सर्वठिकाणी राहावे. मुख्यत्वें अहिंसेचे पाहणे पुढे ठेवून राहावे.||८६।।
आतां सर्व साधना उत्तम : साधन जें निरूपम
ते अहीसा सांघों परम : धर्मरुप ||८७॥
आतां सर्व साधनाला उत्तम जे उपमारहीत साधन आहे. ते श्रेष्ठधर्मरुप अहिंसा साधन सांगतो.||८७॥
तरी आत्मवतें भूते: ऐसे घेतले जयाचेनि चीतें
हेचि वर्म निरुते : अहींसेचें||८८॥
तर माझ्या आत्म्या सारखे सर्व प्राणि मात्र आहेत. असे ज्याच्या मनाने घेतले तर हेच अहिंसा साधनाचे केवळ जिव्हारआहे.||८८।।
आपणयांतें न दुखवी जैसें : भूतमात्रा नागवी तैसें
वृणादिकरुनि मानसें : न भावी वीरु||८९||
जसे आपल्याला दुःख देत नाही. तसे प्राणिमात्रांनाही दुःख देत नाही व गवत मुख्यकरुन मनांत कोणाचे वाईट चिंतन करत नाही. ।।८९।।
ऐसेयां देखणेयांचां पालवी : जें ममत्व भरे जीवीं
मग स्नेहभरीत कासवी : होउनि ठाके।।९०।।
अशा देखण्या वस्त्राने जरा अंत:करणांत ममता भरते. मग स्नेहाने भरलेल्या कासवीप्रमाणे राहतो.||९०।।
तो अहींसेपुरतें : आवघे स्नेहचि आते
आणि तयाचेनि क्षेदअल्हाद मते : तरी घेणवे ना॥९१।।
(घरी असलेला ज्ञानीया) आपल्या अंत:करणात अहिंसेपुरते सर्व स्नेहच भरतो व कर्मराहाटीच्या खेद आल्हादांत व्याप्त होत नाही.||९१॥
ऐसाही बळवत्तरें : करणीयांचेनि सूत्रे
वांचौनि न बोले वर्ग : दृष्टि नुघडी।।९२।।
अश्या प्रकारे रहात असताना करणीये वचनास्तव बलवत्तर क्रीया प्राप्त झाली असता तोडाने बोलतो व डोळ्याने पाहतो आणि बलवत्तर क्रीया नसेल तर तोंडाने बोलत नाही व डोळे उघडत नाही.।।९२।।
तयाचे हळु पाउल पडे : तरी जडीची आकृति न विघडे
चेतनीचा रंगुं न मोडे : हालीचाली||९३॥
अहिंसा साधनामुळे पाउल हळु हळु पडते. तरी जडवस्तुची आकृति मोडत नाही व शरीराच्या हालचालीने चेतन वस्तुचे वर्तन मोडत
नाही.||९३॥
प्रमाणुवतां जीवां : विलयो हों नेदावा
हातु तयांचीया कणवा : हालवी ना||९४||
सूक्ष्म जंतुचा नाश होऊ नये म्हणून (घरी असलेला ज्ञानीया) सूक्ष्म जंतच्याकीवेमुळे आपले हात हालवत नाही.||९४।।
कृपा भरुनि डोळां : दृष्टी सुये पायेतळां
थोरु लंधिमा चाळा : हातासि दे||९५।।
डोळ्यात कृपा भरुन पायाखाली दृष्टी ठेवतो व लहान
-मोठ्या धार्मिकतेच्या सवयी हाताला देतो.||९५।।
यापरी अवेव समस्त : करुनि घाली नेमस्त
तै निश्चळ होति स्वस्त : अहसास्पदी॥९६॥
अशाप्रकारे (घरी असलेला ज्ञानीया) सर्व अवयवांना नियमांत घालतो. त्यावेळी त्याचे सर्व अवयव अहिंसेच्या ठिकाणी चंचलरहीत होऊन स्वस्त होतात.||९६।।
असो हे भूतजात खेदें : जयाचा आत्मा भेदे
ज्ञान सपरिवारी नांदे : तयाचा ठाई॥९७||
आतां अहिंसा साधन राहू द्या. कारण ज्याचा आत्मा प्राणिमात्रांच्या दुःखाने
दुखवतो. त्याच्याठिकाणी भक्तीसहीत व वैराग्यासहीत ज्ञान असते. ॥९७।।
दोष वोडवणे
आपण भूतां न करी खेदु : ऐसाही पुढीले केलेया विरोधु
तेथही न मनी विखादु : आपुलां विर्षे।।९८।।
प्राणिमात्रांंना दुःख देत नाही. असे रहात असताना
जर त्याला कोणी दुःख दिले. तर ते दुःख आपल्या ठिकाणी मानत नाही. ॥९८।।
प्रागनां अनुखंगितें : अथवा संपादिति भुतें
तें सामावी संतासंते : पोटीं आगाधिवेचां॥९९||
(कारण) सुख-दुःख हे प्राक्तनानसार मिळते अथवा प्राक्तन नसतानाही प्राणिमात्र भाव-दुःख देतात. असे जाणून दुसऱ्याने दिलेले सुख-दुःख पोटरूपी समद्रांत सामाऊन घेतो।।९९।।
नाही.||९३॥
प्रमाणुवतां जीवां : विलयो हों नेदावा
हातु तयांचीया कणवा : हालवी ना||९४||
सूक्ष्म जंतुचा नाश होऊ नये म्हणून (घरी असलेला ज्ञानीया) सूक्ष्म जंतच्याकीवेमुळे आपले हात हालवत नाही.||९४।।
कृपा भरुनि डोळां : दृष्टी सुये पायेतळां
थोरु लंधिमा चाळा : हातासि दे||९५।।
डोळ्यात कृपा भरुन पायाखाली दृष्टी ठेवतो व लहान
-मोठ्या धार्मिकतेच्या सवयी हाताला देतो.||९५।।
यापरी अवेव समस्त : करुनि घाली नेमस्त
तै निश्चळ होति स्वस्त : अहसास्पदी॥९६॥
अशाप्रकारे (घरी असलेला ज्ञानीया) सर्व अवयवांना नियमांत घालतो. त्यावेळी त्याचे सर्व अवयव अहिंसेच्या ठिकाणी चंचलरहीत होऊन स्वस्त होतात.||९६।।
असो हे भूतजात खेदें : जयाचा आत्मा भेदे
ज्ञान सपरिवारी नांदे : तयाचा ठाई॥९७||
आतां अहिंसा साधन राहू द्या. कारण ज्याचा आत्मा प्राणिमात्रांच्या दुःखाने
दुखवतो. त्याच्याठिकाणी भक्तीसहीत व वैराग्यासहीत ज्ञान असते. ॥९७।।
दोष वोडवणे
आपण भूतां न करी खेदु : ऐसाही पुढीले केलेया विरोधु
तेथही न मनी विखादु : आपुलां विर्षे।।९८।।
प्राणिमात्रांंना दुःख देत नाही. असे रहात असताना
जर त्याला कोणी दुःख दिले. तर ते दुःख आपल्या ठिकाणी मानत नाही. ॥९८।।
प्रागनां अनुखंगितें : अथवा संपादिति भुतें
तें सामावी संतासंते : पोटीं आगाधिवेचां॥९९||
(कारण) सुख-दुःख हे प्राक्तनानसार मिळते अथवा प्राक्तन नसतानाही प्राणिमात्र भाव-दुःख देतात. असे जाणून दुसऱ्याने दिलेले सुख-दुःख पोटरूपी समद्रांत सामाऊन घेतो।।९९।।
प्रतीति पंथ...🖋

Comments
Post a Comment