पंडित विश्वनाथव्यास बाळापूरकर विरचीत ज्ञानप्रबोध ओवी क्र २१ ते २८

               
                       ।।श्री परेशाय नमः।।                

                                           दिनांक:२७:०३:२०२०
                                                       शुक्रवार


     पंडित विश्वनाथव्यास बाळापूरकर विरचीत
                          ज्ञानप्रबोध

          
ते इश्वरीची सर्व संपती : पुरवी मागतेयाची आर्ती
भणौनि कृपागुण प्रस्तुती : वर्णितु असें॥२१॥

अर्थ: कृपा गुण ईश्वराची सर्वसंपती आहे. कृपा गुण मागणाऱ्या जीवांची इच्छा पूर्ण करते.
म्हणून अगोदर कृपागुणाचे वर्णन करीत आहे.||२१।।


जियेचेनि स्नेहमयंकें : दुखतम निरसे असिकें
तिये प्रभुशक्ती संके : अविद्याजात॥२२॥


अर्थ: ज्या कृपेच्या स्नेहरुपी चंद्रामुळे संपूर्ण दुःखरुपी अंधकार नाहीसा होतो. त्या
ईश्वराच्या कृपाशक्तीला अविद्याजात भिते.।।२२।।


ते अनाथांची माऊली : भवदग्धां विश्रामसाउली
कैवल्यतरुची कल्पवल्ली : सदाफळ॥२३॥

अर्थ: कृपा अनाथ जीवाची माता आहे. ती संसार दग्धल्यांची
सावली आहे. कृपा कैवल्यरुपी वृक्षावरची कल्पनावेल आहे. ती कल्पनावेल जीवांना
नेहमी कैवल्यफळ देते.||२३||


जे केवळे आगाधीचे दीप : ईश्वरी कळा शक्तीरुप
जया ब्रह्मविद्या रोप : सफळ होये॥२४॥

अर्थ: कृपा केवळ अगाध ईश्वरस्वरुपीचे बंदर आहे. कृपा ईश्वरस्वरुपीची शक्तीरुप
चंद्राची सतरावी कळा आहे. ज्या कृपारुपी चंद्राच्या सतरावी कळेमुळे ब्रह्मविद्येचे
रोप कैवल्यफळ देते.||२४||


देखावेया मुक्तिनिधान : कीकै ज्ञान होये दिव्यांजन
परी साध्य होये तें साधन : कृपा जेथ||२५||

अर्थ: मुक्तीचा ठेवा पाहण्याकरीता ज्ञान हे खरोखर दिव्याजंन आहे. परंतु मुक्तीचा
ठेवा मिळविण्याकरीता कृपाच साधन आहे.||२५।।


ते उर्धगामियांधार धात्री : मुक्तिक्षेत्रीची आधिष्टात्री
ब्रह्माक्षरबीजमंत्री : विधान जे॥२६

अर्थ: जीवांची उर्धगती करणारी आधाररुपी पृथ्वी आहे. जसी
पृथ्वी सर्वांना उर्ध करते म्हणजे वाढवते. तशी कृपा सर्वांना उर्ध करते म्हणजे वाढवते आणि
कैवल्याची प्राप्ती करुण देते. कृपा मुक्तीरुपी शेताची अधिष्ठात्री आहे.  ब्रह्मविद्याशास्त्रातील रहस्यरुपी
आचार वचनांंच्याद्वारे सांगते.॥२६।।


ते अजन्म दुःकाळीची तवणी : करी ब्रह्मसुकाळा धणी
ना ना भवपास निर्वाणी : छेदक शस्त्र जे॥२७॥

अर्थ: अनेक जन्मातील दुःखातून मुक्त करणारा उपाय आहे. तो क्रुपा उपाय
ईश्वर सुकाळाने समाधान करतो. ना ना प्रकारच्या भवपाश्यातून शेवटी कृपा अविद्यारुपी पाश छेदणारे शस्त्र आहे||२७||

ते राजहंसी निरंतरी : असे कैवल्य-मानसरोवरी ।
जे जीवा अविद्ये निवाडु करी : सुधपणे॥२८॥

अर्थ: ती कृपारुपी राजहंसी सदोदीत कैवल्यरुपी मानस सरोवरावर असते. जी कृपारुपी
राजहंसी जीवाला शुध्दपणे अविद्येपासून वेगळी निवडून काढते.॥२८॥



                                 प्रतीति पंथ....... 🖋





Comments

Popular posts from this blog

विश्वनाथव्यास बाळापुरकर विरचीत ज्ञानप्रबोध ओवी क्रमांक १ ते १० अर्था सह।

पंडित विश्वनाथव्यास बाळापूरकर विरचीत ज्ञानप्रबोध ओवी क्र २९ ते ४८

पंडित विश्वनाथव्यास बाळापूरकर विरचीत ज्ञानप्रबोध ओवी क्र ४९ ते ६७